Friday 2 February 2018

पोलीस दलाचे ''रोशन''
कुणाल जाधव, मुलाखतकार 
काही व्यक्ती अशा असतात की, ज्यांना सातत्याने समाजाची काळजी सतावत असते. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येऊनदेखील ऐशोआरामाचे जीवन जगण्यापेक्षा काहीतरी करण्याची उर्मी त्यांना सतावत असते आणि हीच उर्मी त्यांना समाजाचे सेवक बनवते. समाजाबरोबर बांधील राहून या समाजाचे ऋण फिटवण्याचा प्रयत्न करीत असतात अशाच व्यक्तींमध्ये पालघर जिल्ह्याचे अतिरीक्त पोलीस अधिक्षक आयपीएस  राज तिलक रौशन यांचे नाव घ्यावेसे वाटते. उच्चशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या राज तिलक रौशन यांनी परदेशातील गलेलठ्ठ नोकरीला लाथाडून आपल्या माणसांमध्ये राहून त्यांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे. अशा या विलक्षण व्यक्तीमत्त्वाशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...

⚫ पोलीस दलात सहभागी होण्यामागील हेतू
प्रथम पालक आपल्याला प्रोत्साहन द्यायचे. आपल्या पाल्याने या क्षेत्रात आपले भविष्य घडवावे असे त्यांना वाटते त्याप्रमाणे ते आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. तसे पाहिले तर माझे वडील एमबीबीएस डॉक्टर असल्याने सर्वांना मीदेखील या क्षेत्रातच आपले भविष्य करेन असे वाटले होते.  माझे शिक्षण आयआयटी खरगपूर येथून झाले आहे. बी.टेक., एम. टेक दोन्हीही येथूनच केले आहे. ना माझ्या कुटुंबात वा गावात कुणी आयपीएस झालेले आहे. त्यामुळे खास ठरवून या क्षेत्रात आलो नाही. सुमारे 5 वर्षे सर्वसामान्य तरुणांप्रमाणे मी देखील खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यावेळी मी इटली आणि जर्मनीत होतो. बेंगलोर, नोएडा, गुरगाव येथे नोकरी करीत होतो. त्यावेळी मी इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन आणि ई कॉमर्स फिल्ड असलेल्या एमएनसिएस कंपनीत काम केले. त्याचदरम्यान मी पोलीस दलाची परिक्षा दिली. तेव्हा माझी निवड झाली. माझ्या कुटुंबात मी पहिलीच व्यक्ती आहे जो आयपीएस अधिकारी आहे. 

⚫खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील फरकाबाबत काय सांगाल?
खासगी क्षेत्रात जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा ते तुमच्यापुरते मर्यादित असते. याठिकाणी तुम्हाला वेतनदेखील तुमच्या क्वालिफिकेशन मिळते. पण जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही काम करता... खासकरून जनतेसाठी तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. जनकल्याणासाठी तुम्ही तुमचे आयुष्य वेचताय ही निश्चितच आनंदाची बाब आहे. सार्वजनिक क्षेत्रात तुम्हाला तुमच्या कामाची व्याप्ती वाढवायची संधी मिळते. प्रत्येक गोष्टीत तुम्ही काही ना काही करण्याची धडपड ठेवून असता आणि ही नक्कीच आनंदाची बाब असते. 

⚫खासगी क्षेत्रात उत्तम सुरु असताना आयपीएस होण्याचा विचार?
खाजगी छेत्रात काम करताना यू मेक द रिच पिपल रिचर असे असते. म्हणजेच तुमचा कामाचा सर्वाधीक फायदा हा त्या खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी असतो. मी परदेशातही नोकरी केली. पण तितके समाधान लाभले नाही. देशासाठी काहीतरी करावे ही भावना सातत्याने सतावत होती. त्यामुळेच या क्षेत्रात येण्याचा विचार केला. या क्षेत्रात येणे इतके सोपे नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टींची सामान्य माहिती हवी असते, समोरच्या व्यक्तीबरोबर बोलण्याचे कौशल्य या सर्व गोष्टी आपल्याला शाळा-महाविद्यालयात शिकवल्या जातात. पुढे त्यांचा उपयोग आपण करतो. तुमच्या आत्मविश्वास असला पाहिजे, स्पष्टवक्तेपणा असला पाहिजे. भाषांचे ज्ञान आणि त्यावर थोडेफार प्रभुत्व असणे आवश्यक आहे. 

⚫यूपीएससीधारकांसाठी काही मार्गदर्शन कराल का?
यूपीएससीच्या मुलाखतीसाठी तयारी करताना तुम्हाला सर्वप्रथम तुमचा रेज्युमे अर्थात तुमची व्यक्तीगत माहिती ही वाढवण्याची गरज आहे. शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण, एखादा कोर्स, नोकरीचा अनुभव, तुमचे छंद आदी सर्वांवर योग्य पकड असणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही विषयाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले असता त्याची उत्तरे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या रेज्युमेमध्ये पुस्तक वाचण्याचा छंद असल्याचे नमूद करीत असाल तर हेही लक्षात ठेवा मुलाखतीदरम्यान, तुम्हाला तशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके वाचली आहेत त्यावर आधारित पुस्तकांवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आल्यास तुमच्याकडे उत्तरे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही कशाप्रकारे उत्तर देता, तुम्ही प्रश्न नीट लक्ष देऊन ऐका...अन्यथा प्रश्न न समजता तुम्ही उत्तर दिलेत तर परिक्षकांवर तुमचे इम्प्रेशन चुकीचे पडेल. प्रश्न न समजल्यास पुन्हा एकदा विचारा... त्याचबरोबर तुमची देहबोली कशी आहे याचाही सर्वांगाने यात विचार होतो. 

⚫तुमच्या करियअरची सुरुवात कशी झाली?
असिस्टंट सुपरिटेंडट ऑफ पोलीस असे आमचे प्रोबेशन असते. सुरुवातीला आम्हाला तीन महिन्यांसाठी एखाद्या पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात येतो. त्यावेळी तो पीआयचा दर्जा असतो. त्याचवेळी ग्राऊंड लेव्हल सर्व शिकवले जाते. आमचे मॅनपॉवर कशाप्रकारचे आहे, त्यांची क्षमता कशी आहे.  एखाद्या केसची इन्वेस्टीकेशन कशा प्रकारे करावयाची आहे, कायदा व सुव्यवस्था कशा प्रकारे हाथळायची. स्थानिक पोलीस  स्थानकांमध्ये कामकाजाची पद्धत्ती हाथळायची असते. माझे पहिले प्रोबेशन पूर्णा पोलीस ठाण्यात झाले होते. हा परिसर पूर्णतः संवेदनशील परिसर होता. त्यानंतर उस्मानाबादमध्ये माझी पोस्टिंग झाली.

⚫पोस्टिंगदरम्यानचा एखादा अनुभव सांगाल का?
उस्मानाबादमध्ये पोस्टिंग झाली त्यावेळी माझ्या हातात पहिलीच केस आली होती. जानेवारी 2016 मध्ये मी उस्मानाबादमध्ये आलो. त्यावेळी माझ्याकडे एक केस आली होती. डिसेंबर 2016 मध्ये एक हत्याप्रकरण घडले होते. मी त्या घटनेचा तपास करायला मे मध्ये घेतला होता. एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला होता. तिच्या अंगावरील कपडे नीट असल्याने ती चांगल्या कुटुंबातील वाटत होती. मृतदेहाचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने आम्ही फोटो सर्व पोलीस ठाण्याला पाठवून दिले होते. तपास करीत असताना त्या मुलीच्या अंगावर असलेल्या कुर्तीवर जयपूर कुर्ती डॉट कॉम असे लिहिले होते. त्या एका पुराव्याच्या आधारावर मी ऑनलाईन तपासाला सुरुवात केली. तपास करीत असताना मृत मुलीने फ्लिपकार्टवरून तिने घातलेले टॉप मागवलेले होते. सर्वप्रथम आरोपींना पकडले आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. अवघ्या 10 दिवसांत मी या गुन्ह्याचा तपास घेतला. यशस्वीरित्या गुन्ह्याचा तपास तेही इतक्या कमी वेळात त्यामुळे आयजींकडूनही शाबासकीची थाप मिळाली. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या ट्रेनिंग सिलॅबसमध्ये ही केस शिकवण्यासाठी समाविष्ट करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये मी एप्रिलपर्यंत होतो. त्यानंतर मी 30 एप्रिल 2016 मध्ये पालघरला आलो. याठिकाणी मी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली.

⚫पालघर जिल्ह्याचा कामाचा अनुभव सांगाल?
पालघरमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर असे पाहण्यात आले की, पालघरमध्ये मुले हरवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मे 2016 मध्ये मी या ठिकाणी आलो तेव्हा 66 टक्के हरवलेल्या मुलांना शोधण्यात आले आहे. त्यामुळे सर्वाधिक भर आम्ही बेपत्ता मुलांना शोधण्यावर अधिक भर दिला आहे आमच्यासाठी ते एक मिशन आहे. पालघर जिल्ह्यांतर्गत येणार्या सर्व पोलीस स्थानकांत हरवलेल्या, बेपत्ता मुलांचा शोध घेणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे सांगून जेव्हा एखादी अशाप्रकारची केस येते तेव्हा त्याचा सर्वप्रथम तपास प्राधान्याने करावा हे सांगितले. जेवढ्या ठिकाणी शोधणे शक्य आहे जसे आश्रम, एनजीओ याठिकाणी शोध घेतला जातो. यासाठी आरपीएफची मदत घेतली जाते. मिसिंग केसेससाठी  एक एसओपी तयार करण्यात आली आहे. जोरदारपणे मोहीम राबवल्याने वर्ष 2015-16 आणि 2017चा विचार करता हरवलेल्या मुलांना शोधण्याचे प्रमाण 94% टक्क्यांवर पोहोचले आहे. एकूण चांगलेच यश आम्हाला मिळत आहे. हरवलेल्या मुलांसाठी माझ्या कार्यालयात मी वेगळा स्टाफ ठेवला आहे. ज्यामध्ये 6 जण काम करतात. मी स्वतः दर दिवशी याबाबतची माहीती मागवतो. तसेच तुळींज, माणिकपूर, वालिव, विरार व नालासोपारा 5 पोलीस स्टेशनमध्ये आम्ही खास करुन या संदर्भात काम करतो तेथे ही वेगळी टिम यासाठी बसवलेली आहे. आम्ही 1999 पासून आजपर्यंतचे सर्व केसेसचा पुन्हा तपास सुरु केला आहे. या दरम्यान आमच्या कडे वालीव पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग ची केस आली होती. त्याचा तपास केला असता त्यामध्ये हत्या झाल्याचे आढळून आले होते. व त्या केसची नोंद ठाण्याच्या हद्दीमध्ये झाली होती. त्याचा आम्ही निकाल लावला. उदाहरण द्याचे झाले तर अशीच एक 2015 मधील मिसिंगची केस होती. त्यामध्ये आम्ही आता 2017 मध्ये हरिद्वारमधून शोधण्यात आम्हाला त्यात यश आले. अशा अनेक अपहरणाच्या केस ही केल्या आहेत ज्यामध्ये आम्हाला मिळालेल्या माहितीनूसार आम्ही तपास केला असता काही मुलींना बाहेर ही नेण्यात आले होते. त्यांनाही आम्ही परत आणले. याचे श्रेय मी येथील सर्व पोलीस स्टेशन व तेथील काम करणार्‍या माझ्या संपुर्ण सहकार्यांना देतो. जे अगदी मनापासून यामध्ये काम करत आहेत.

⚫गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत तुम्ही काय सांगाल?
तसे पाहिले तर गुन्हेगारी ही उपजत नसते. कधी कधी ती परिस्थितीमुळे निर्माण होते. त्यानुसार एखादी व्यक्ती ही जन्मापासूनच गुन्हेगार नसते. ती परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळते. तर काही गुन्ह्यांमध्ये व्हाईट कॉलर म्हणजेच गर्भश्रीमंत, नावाजलेल्या बड्या व्यक्तीही गुन्हेगार बनले आहेत. ते कसे बनले आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.

⚫तुळजापूर केस बद्दलचा अनुभव सांगाल?
तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर मी होतो. तुळजापूर 20 दिवसांची ही यात्रा असते. तुळजापूर यात्रेसाठी राज्य शासनकडून तुळजापूर यात्रेसाठी अनुदान येत असते. असाच  प्रकारचे आलेल्या अनुदानामध्ये मी रुजू होण्याच्या 4 वर्षांपूर्वी घोटाळा झाला होता. यामध्ये तत्कालिन तेथील नगराध्यक्ष, नगरसेवक, तुळजापूर नगरपरिषदेचे  सिओ, अकाऊंट विभागाचे अधिकारी असे सर्व आरोपी येत होते. याचा संपुर्ण तपास मी केला होता. हा एकुण 1 करोड 62 लाखांचा घोटाळा होता व याचा 95 टक्के तपास मी 1 महिन्यांच्या आत पुर्ण केला होता . त्याचे संपुर्ण पेपर वर्क मी पुर्ण केले होते. एक घराचे कपाट भरेल एवढे त्याची कागदपत्रे झाली होती. तसेच त्यावेळी हे सर्व जण फरार ही झाले होते. तुळजापूर मधील ही एक सर्वात मोठी केस पुर्ण केली होती.

⚫खोटे गुन्हे नोंदवले जातात याबाबत काय सांगाल.
 याबाबतीत सांगायचे झाले तर, असा एक प्रकार तुळजापूर मध्ये घडला होता. परंतू सत्य तपासमध्ये बाहेर आले. दोन व्यक्ती आमच्याकडे आल्या होत्या. ज्यांनी त्यांचा ट्रक माला सोबत चोरीला गेला आहे असे त्यांचे म्हणने होते. 4 जणांनी येऊन आम्हाला बंदुकीचा धाक दाखवून आमचा ट्रक आणि माल चोरुन पसार झाले असे त्यांचे म्हणणे होते. हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर आम्हाला या प्रकरणात संशय आला. त्यानंतर याचा तपास केला असता आलेल्या तक्रारदारांनीच माल विकला होता व ट्रक चे इन्श्युरस क्लेम केले होते. अंती ट्रक व माल दोन्ही मिळाले व त्या दोघांवर कलम 420 ने गुन्हे दाखल केले. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, असे गुन्हे ही येत असतात. पण पोलिसांना न्यायालयाच्या ललिता कुमारी जजमेंट नुसार तक्रार दाखल करण्यापूर्वी तपास करण्याचा अधिकार आहे. व अशा प्रकारे संशय आल्यास आम्ही तपास करत असतो.

⚫या क्षेत्रात आल्यानंतर काय करण्याची इच्छा आहे?
आम्ही समाजाला बांधील आहोत त्यामुळे समाजाला देण्यासाठी लागणारे पाठबळ महत्त्वाचे आहे. आमची त्यांच्याप्रती असलेली कार्यतत्परता जलद असली पाहिजे. कामात पारदर्शीपणा असला पाहिजे. माझ्या पोलीस बांधवांनादेखील मी हेच सांगू इच्छितो की, तुमच्या कामात पारदर्शीपणा आणा, जनतेचे आपण सेवक असून आपण आपले कर्तव्य योग्य प्रकारे निभावणे गरजेचे आहे. पोलीस स्थानकात येणार्या सर्वसामान्य जनतेला तुमच्याप्रती भिती नसली पाहिजे, तुम्ही त्यांचे मित्र बना... त्यांनी आणलेल्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्याचा प्रयत्न करा.

⚫या क्षेत्रातील तुमचा आदर्श कोणाला मानता?
वास्तविक मी कुणालाही स्वतःचा आदर्श मानत नाही. ज्यांच्याकडून मला शिकता येईल, काही पॉझिटिव्ह घेता येईल अशांना मी माझा आदर्श मानतो. तसे पाहिले तर मी आयुष्यभर शिकत राहणार आहे. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्ती आणि ज्यांच्याकडून मला शिकायला मिळाले ते सर्व माझी प्रेरणा आहेत. माझ्या कुटुंबात माझे वडील, बहिण आणि भावजी डॉक्टर आहेत. तरीही मला कुणीही या क्षेत्रात येण्यासाठी अडवले नाही उलट प्रोत्साहित केले. हेच माझ्यासाठी खूप आहे.

⚫पोस्टिंगदरम्यान एखाद्या दंगलीचा अनुभव आला का?
उस्मानाबादमध्ये पोस्टिंग असताना असे अनुभव बरेचदा आले होते. एखाद्या कारणावरून दंगल उसळण्याची खबर मिळताच आम्हाला अलर्ट केले जाते. दंगलीपूर्वी आणि दंगलीदरम्यानचे वातावरण शांत ठेवण्याचे आमच्यापुढे एक आव्हान असते. काही वेळेस यशस्वीही झालो होतो मात्र एका घटनेत असे घडले होते. पोस्टर फाडण्यावरून दोन जमावांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. दोन्हीकडेही 150-150 लोकांचा जमाव होता. त्यांना शांत करणे हे आमच्यासाठी आव्हान होते. दोन्ही गटातील लोक ऐकायला तयार नव्हते. परस्परांवर आरोप प्रत्यारोप करीत होते. अखेर दोघांवरही आम्ही गुन्हे दाखल केले. त्यानंतर दोन्ही गटाला वेगवेगळे घेऊन समजावले. पुन्हा असा वाद घातल्यास सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितल्यानंतर वातावरण थोडेफार शांत झाले.

⚫युवा व नागरिकांना काय संदेश द्याल?
युवा वर्गाने या क्षेत्रात आले पाहिजे. समाजासाठी काम करण्याची एकमेव संधी आहे. पोलीस आणि त्यांची खाकी खुप काही शिकवते. समाजतील वाईट घटकांना आपण कायद्याच्या माध्यमातून धडा शिकवू शकतो. महिलांनी सोशल मीडियाचा वापर सांभाळून केला पाहिजे. कोणत्याही गोष्टींना भुलून जाता कामा नये. तसेच सोशल मीडियावर सर्व महिती कधी ही पोस्ट करू नये. याचा गैरफायदा अनेक जण घेत असतात. मेहेनत व शिस्त आणि विचारपुर्वक केलेली कृती ही यशाची खरी किल्ली आहे. आयुष्यात केव्हा ही यशाची पायरी चढताना आपली  नैतिक मुल्ये विसरू नयेत. जाता जाता एकच सांगेन... be an alert and responsible citizen. Police is good with good people and bad with bad people.... . आपल्या वर्तमानपत्रास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

#Interview of Palghar dist. Add. SP Raj tilak Roushan

Tuesday 2 January 2018

#harshali #diwaliank2017 #magazine #Kalburgi #govindpansare #narendradabholkar #gaurilankesh #2017 #lekh 

#harshali #diwaliank2017 #magazine #hocky #hockyindia #interview #2017 #lekh 


#harshali #diwaliank2017 #magazine #maharashtrapolice #palgharpolice #prakashbirajdar #boiser #harshprakashan  #interview #2017 #lekh 

Friday 8 December 2017





महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, मराठी हृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या ‘कृष्णकृंज’ येथील निवासस्थानी, त्यांच्या खासगी कक्षात ‘हर्ष’ प्रकाशनाच्या ‘हर्षाली’ मासिकाचा छोटेखानी प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी 'हर्षाली' मासिकाचे मुख्य संपादक कुणाल जाधव यांनी राज ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. तसेच अंक पाहिल्यावर ‘स्त्री भ्रूण हत्या’ आणि ‘पर्यावरण’ या दोन्ही विषयांचा सुरेख संगम साधत हे मासिक समाजप्रबोधन करणारे आहे’ असे कौतुकोद्गार राज ठाकरे यांनी यावेळी मांडले आणि ‘हर्ष’ प्रकाशनाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘हर्षाली’ मासिकाच्या सहाय्यक संपादक कविता गरुड, बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान, उपसंपादक अमित राणे, उपसंपादक प्रशांत गोमाणे आदी मान्यवर उपस्थित होते. 


Harshali Magazine inauguration by Maharashtra Navnirman Sena, cheif shri. Raj Thakrey with harshali magazine editor Kunal Jadhav , kavita garud, bahujan mahaparty secretary shamshuddin khan, subeditor amit rane, subeditor prashant gomane.


#harshali #harshalidiwaliank #kunaljadhav #rajthakrey #mns #maharashtranavnirmansena #krushnakunj #magazine #2017 #diwali #diwaliank2017 

Sunday 19 November 2017


#harshali #harshalidiwaliank2017 #bhushanpatil #righter #lekh #pollution #artical #magazine

#harshali #harshalidiwaliank2017 #bhushanpatil #righter #lekh #pollution #artical #magazine