Wednesday 11 January 2017

युवा आमदार क्षितीज ठाकुर यांची विद्यार्थ्यांसाठी रेल्वेने
राखिव स्वतंत्र डब्बा देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

बहुजन विकास आघाडी व वसई-विरार महानगर पालिका
15 दिवसांच्या आत प्रत्येक रेल्वे स्थानकावर सह्यांची मोहिम राबवणार

कुणाल जाधव
वसई : रेल्वेतून प्रवास करताना विद्यार्थ्यांचे होणार हाल लक्षात घेऊन वसईतील नालासोपार्‍याचे आमदार क्षितीज ठाकुर यांनी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रेल्वेने एक राखिव स्वतंत्र डब्बा देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्याने अनेक मुले-मुलींना शिक्षणासाठी दररोज रेल्वेने प्रवास करावा लागतो. कामकाजाच्या वेळेतील गर्दी पाहता शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतात.
यासंदर्भात क्षितीज ठाकुर यांनी असे सांगितले की, पालघर जिल्हा आदीवासी जिल्हा असून अनेक विद्यार्थी मुंबईला धरुन प्रवास करत असतात, खास करुन परिक्षेच्यावेळी बाहेरच्या विद्यार्थ्यांचे हाल होतात. काही वेळा गर्दीमुळे ट्रेन सुटते. याचा परिणाम त्यांच्या गुणांवर होतो. अंदाजे पाच लाख लोक पालघर जिल्ह्यातून रोजगार निमित्त मुंबईला प्रवास करतात. सर्वात जास्त ‘टिकीट सेलिंग’ वाढ ही नालासोपारा स्थानकावर आहे. असे पाहता आमच्या तीन मागण्या आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या वेळे दरम्यान स्पेशल ट्रेन सुरु करावी तसे होत नसल्यास जसा महिलांसाठी राखिव डब्बा आहे तसाच विद्यार्थ्यांसाठी असवा जर, त्यामध्ये अडचणी येत असेल तर किमान बोर्ड परिक्षेच्या वेळी राखिव डब्बा असावा. अश्या मागण्या आम्ही केल्या आहेत.
बहुजन विकास आघाडीचे तिन्ही आमदार व वसई-विरार महानगर पालिका यासंदर्भात प्रत्येक रेल्वे स्थानकावर येणार्‍या पंधरा दिवसांमध्ये सह्यांची मोहिम राबवणार आहे असे आमदार क्षितीज ठाकुर यांनी सांगितले.


आमच्या तीन मागण्या आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या वेळे दरम्यान स्पेशल ट्रेन सुरु करावी तसे होत नसल्यास जसा महिलांसाठी राखिव डब्बा आहे तसाच विद्यार्थ्यांसाठी असवा जर, त्यामध्ये अडचणी येत असेल तर किमान बोर्ड परिक्षेच्या वेळी राखिव डब्बा असवा.
-क्षितीज ठाकुर
आमदार, नालासोपारा

No comments:

Post a Comment