Thursday, 13 October 2016
वसई-विरार महानगरपालिकेच्या खाजगी बसेसना
परिवहन मंत्र्यांचा रेड सिग्नल
परिवहन मंत्र्यांचा रेड सिग्नल
परिवहन मंत्र्यांची खाजगी बसेसवर करडीनजर
वसई-विरार मनपाच्या खाजगी ठेकेदारांची पळताभुई
कुणाल जाधव
मुंबई : वसई-विरार महानगरपालिकेमार्फत खाजगी ठेकेदारांनी सुरु केलेल्या बसेस सेवा बंद करण्यात येर्दल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या खाजगी ठेकेदारांमध्ये काही राजकीय काही राजकीय नेत्यांचे अप्रत्यक्षपणे हित असल्याचे त्यांनी संशय व्यक्त केला आहे. मंत्री रावते जसे बोलतात ते करून दाखवतात त्यामुळे खाजगी ठेकेदारांची चांगलीच पळताभुई झाली आहे.
मुंबई : वसई-विरार महानगरपालिकेमार्फत खाजगी ठेकेदारांनी सुरु केलेल्या बसेस सेवा बंद करण्यात येर्दल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या खाजगी ठेकेदारांमध्ये काही राजकीय काही राजकीय नेत्यांचे अप्रत्यक्षपणे हित असल्याचे त्यांनी संशय व्यक्त केला आहे. मंत्री रावते जसे बोलतात ते करून दाखवतात त्यामुळे खाजगी ठेकेदारांची चांगलीच पळताभुई झाली आहे.
वसई तालुक्यातील गेली 60 वर्षे राज्य परिवहन महामंडळाची परिवहन सेवा चालू आहे. विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी महामंडळाची परिवहनाची सेवा म्हणजे एक वरदान आहे. विशेष म्हणजे खाजगी बसेस मधून सेवा करण्यापेक्षा स्त्रियांना महामंडळाच्या बसेसमधून प्रवास सुरक्षित वाटते. यामुळे गावकर्यांनी राज्य परिवहनच्या बसेस चालू करण्याची मागणी केल्याने परिवहन मंत्र्यांनी या खाजगी बसेस हटविण्याचा विडा उचलला आहे.
वसई-विरार भागातील काही गावे महानगर पालिकेतून वगळल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या मागणीनुसार महाराष्ट्र परिवहन महामंडळाची नालासोपारा आगारातून 16 बसेस आणि वसई आगारातून नऊ बसेस सुरु आहेत. ज्या मार्गावरून बसेस चालू आहेत त्या मार्गावरील काही गावे ग्रामपंचायत हद्दीतच आहेत.
नालासोपारा व वसई आगारातून लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी बसेस सेवा पुरविल्या जातात. परंतु आगारातील काही प्रमाणातील जागा भाड्याने देण्यासाठी वसई-विरार महानगर पालिकेने राज्य सरकारकडे मागणी केल्याने एस.टी. सेवा कालांतरोन हद्दपार होण्याची भिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतील. याकडे नालासोपारा व वसईतील काही सामाजिक संस्थांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे लक्ष वेधले आहे.
Thursday, 1 September 2016
कर्तव्याचा आणखी एक बळी
वाहतुक पोलीस विलास शिंदे यांचे निधन
कुणाल जाधव
8976629534
मुंबई : आठ दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली. 23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना विलास शिंदेंना दोन मुलांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती.
विलास शिंदेंची नेत्रदान करण्याची इच्छा होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मात्र शवविच्छेदनानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. शवविच्छदानानंतर शिंदेंचं पार्थिव त्यांच्या वरळीतील राहत्या घरी आणले जाणार आहे.
विलास शिंदेंना केलेल्या मारहाणीचे कारण काय तर विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्याला थांबवले आणि लायसन्सची मागणी केली. पण गुंडांच्या मारहाणीत एकट्या विलास शिंदेंचा मृत्यू झाला नाही तर इथली कायदा आणि सुव्यवस्था किती मरणासन्न अवस्थेत आहे, याचे दर्शन घडले.
विलास शिंदेंना मारहाण करणारा आरोपी अहमद महमद अली कुरेशीसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक केली आहे. पण त्यामुळे विलास शिंदेंचा गेलेला जीव पुन्हा परत येणार नाही. मतांच्या राजकारणासाठी मुस्लिम टोळक्याला हात लावला जात नाही, असा आरोप करत राज ठाकरेंनी मारहाण प्रकरणाला धार्मिक रंग दिला आहे.
देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून क्राईम रेट कमी झाल्याचा दावा मोठ्या आवेशात करतात. पण थेट वर्दीवर हात टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. शशिकांत कालगुडेनं महिला कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली होती. तुमसरच्या आमदाराने पोलीस शिपायाच्या कानशिलात भडकावली होती. तर आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकार्याच्या अंगावर हात उचलला होता.
अशा घटनांमुळे छोट्या-मोठ्या गावगुंडांची हिंमत वाढते आणि ते सहज पोलिसांवर हात उचलतात. त्यामुळेच विलास शिंदेंचा बळी गेला आहे. आता तरी देवेंद्र फडणवीसांनी आकडेमोकड करत आधीच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा गांभीर्याने विचार करावा आणि पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होणार नाही. अशा कायद्याचा धाक निर्माण करावा. हीच विलास शिंदेंना खरी श्रद्धांजली ठरेल.
...........................................
मुख्यमंत्र्यांना घेराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला.
...........................................
25 लाखांची मदत
विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.
...........................................
हि घटना अतिशय निंदनीय आहे. पोलीसदलातर्फे याचा निषेध आहे. ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे त्याच्या भावाने निर्दयीपणे केले हा हल्ला विलास शिंदे सेवेत कार्यरत असताना होणे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे तो मुलागा अल्पवयीन असतानाही त्या मुलाला गाडी दिल्याबद्दल त्याच्या घरातील जबाबदार व्यक्तीवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
अनिल पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक (माणिकपूर पोलीस स्टेशन)
Subscribe to:
Posts (Atom)










