Thursday, 22 September 2016
Thursday, 1 September 2016
कर्तव्याचा आणखी एक बळी
वाहतुक पोलीस विलास शिंदे यांचे निधन
कुणाल जाधव
8976629534
मुंबई : आठ दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली. 23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना विलास शिंदेंना दोन मुलांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती.
विलास शिंदेंची नेत्रदान करण्याची इच्छा होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मात्र शवविच्छेदनानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. शवविच्छदानानंतर शिंदेंचं पार्थिव त्यांच्या वरळीतील राहत्या घरी आणले जाणार आहे.
विलास शिंदेंना केलेल्या मारहाणीचे कारण काय तर विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्याला थांबवले आणि लायसन्सची मागणी केली. पण गुंडांच्या मारहाणीत एकट्या विलास शिंदेंचा मृत्यू झाला नाही तर इथली कायदा आणि सुव्यवस्था किती मरणासन्न अवस्थेत आहे, याचे दर्शन घडले.
विलास शिंदेंना मारहाण करणारा आरोपी अहमद महमद अली कुरेशीसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक केली आहे. पण त्यामुळे विलास शिंदेंचा गेलेला जीव पुन्हा परत येणार नाही. मतांच्या राजकारणासाठी मुस्लिम टोळक्याला हात लावला जात नाही, असा आरोप करत राज ठाकरेंनी मारहाण प्रकरणाला धार्मिक रंग दिला आहे.
देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून क्राईम रेट कमी झाल्याचा दावा मोठ्या आवेशात करतात. पण थेट वर्दीवर हात टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. शशिकांत कालगुडेनं महिला कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली होती. तुमसरच्या आमदाराने पोलीस शिपायाच्या कानशिलात भडकावली होती. तर आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकार्याच्या अंगावर हात उचलला होता.
अशा घटनांमुळे छोट्या-मोठ्या गावगुंडांची हिंमत वाढते आणि ते सहज पोलिसांवर हात उचलतात. त्यामुळेच विलास शिंदेंचा बळी गेला आहे. आता तरी देवेंद्र फडणवीसांनी आकडेमोकड करत आधीच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा गांभीर्याने विचार करावा आणि पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होणार नाही. अशा कायद्याचा धाक निर्माण करावा. हीच विलास शिंदेंना खरी श्रद्धांजली ठरेल.
...........................................
मुख्यमंत्र्यांना घेराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला.
...........................................
25 लाखांची मदत
विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.
...........................................
हि घटना अतिशय निंदनीय आहे. पोलीसदलातर्फे याचा निषेध आहे. ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे त्याच्या भावाने निर्दयीपणे केले हा हल्ला विलास शिंदे सेवेत कार्यरत असताना होणे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे तो मुलागा अल्पवयीन असतानाही त्या मुलाला गाडी दिल्याबद्दल त्याच्या घरातील जबाबदार व्यक्तीवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
अनिल पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक (माणिकपूर पोलीस स्टेशन)
Wednesday, 31 August 2016
सतीश माथूर राज्याचे नवे पोलीस महासंचालक
“सुखरुप जनता आणि सुरक्षित महाराष्ट्र’ हे माझे कर्तव्य आणि मिशन आहे”
कुणाल जाधव
8976629534
भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी सतीश माथूर यांची राज्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती केली. माथूर सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीचे महासंचालक म्हणुन काम पाहत होते.
राजकीय नेत्यांपेक्षाही महाराष्ट्रातल्या कर्तबकार पोलीस आणि प्रशासकीय आय. ए. एस. आणि आय.पी. एस्. अधिकार्यांची परंपरा अधिक गौरवशाली आणि अभिमानास्पद आहे. इतर राज्यांबाबत असे ऐकायला मिळते की तेथील अधिकार्यांवर राजकीय नेत्यांचा वरचष्मा, दबाव आणि हस्तक्षेप वाजवीपेक्षा जास्त असतो. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नुकतीच सतीश माथूर यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.
सतीश माथूर यांना महाराष्ट्र, तळहातावरच्या रेषांसारखा, परिचित असावा. ते प्रत्येक पक्षाच्या हर एक नेत्याला जाणून आहेत. राजकीय अंतःप्रवाहांचा त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक चळवळी, आंदोलने, संघर्ष आणि समीकरणे, त्यांनी वेळोवेळी जवळून, पाहिली, अनुभवली आहेत. पक्षांची आणि नेत्यांची ‘बलस्थाने’ आणि ‘कच्चे दुवे’ त्यांना ठाऊक असल्याने त्यांना कशा पद्धतीने हाताळून शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखायची याची त्यांना कल्पना आहे.
एकेकाळी मुंबईत ‘अंडरवर्ल्ड’ आणि मुंबईबाहेर ‘क्रिमिनल गँगस्टर्स’चे आव्हान पोलीस दलापुढे होते.
मुंबईतल्या उद्योग, व्यापार, व्यवसायातील सधन लोकांना होणारा ‘खंडणी’चा उपद्रव ही एक समस्या पूर्वी होती, आता त्याची तीव्रता कमी झालेली असली तरी खंडणीसाठी धमक्या-अपहरण-खून हा विषय संपलेला नाही.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेच्या विशेष अपेक्षा आहेत कारण आजवरची त्यांची कामगिरी ‘विशेष’ आहे आणि व्यक्ती म्हणूनही सतीश माथूर ‘विशेष’ आहेत.
सतीश माथूर यांना अनुकूल अशा काही गोष्टी आहेत, त्यातली एक म्हणजे त्यांचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना स्वातंत्र्य देणारे, लोकहिताच्या निर्णयात पाठराखण करणारे आणि अकारण, अवाजवी हस्तक्षेप न करणारे आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘सुखी’ महाराष्ट्राचे स्वप्न, डी.जी. सतीश माथूर यांनी सांभाळलेल्या ‘शांत’ महाराष्ट्रातच साकार होऊ शकणार आहे. त्यामुळेच देवेंद्रांनी सतीश माथूर यांची एका विश्वासाने या पदावर नियुक्ती केली आहे.
सुदैवाने मुंबईत दत्ता पडसलगीकरांसारखे समर्पित आणि सम्यक व्यक्तिमत्वाचे पोलीस आयुक्त आहेत तर महाराष्ट्राचे महासंचालक सतीश माथूर यांच्यासारखे ‘रोल मॉडेल-आयकॉनिक-अॅडमिनीस्ट्रे टर’ आहेत त्यामुळे पोलीस दलाबद्दलची विश्वासार्हता वादातीत आहे. ‘दिल्या शब्दाला जागणारं, चारित्र्यसंपन्न नेतृत्व’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राजकीय क्षेत्रात लाभलेले असताना, मुंबई आणि महाराष्ट्रातील पोलीस दलाची सूत्रे दत्ता पडसलगीकर आणि सतीश माथूर यांच्यासारख्या कर्तृत्ववान प्रशासकीय अधिकार्यांच्या हाती असावीत ही गोष्ट महाराष्ट्राला निश्चित आणि निर्धास्त करणारी आहे.
Thursday, 18 August 2016
मंडप उभारा.. वाहतूक रोखा
पालिकेच्या बोटचेप्या धोरणामुळे गणेशोत्सव मंडळांना कायद्याचा धाक नाही
कुणाल जाधव
8976629534
वसई : ‘रस्त्यावर मंडप उभारा आणि वाहतुकीस अडथळा करा’ अशी उत्सवाची नवी परंपरा वसई-विरार मध्ये गेल्या काही वर्षांपासून रजू लागली असून रस्त्याच्या एकतृतीयांश जागेवर गणेशोत्सवाचे मंडप उभारण्याची परवानगी असतानाही त्याहून अधिक जागेवर अनेक मंडळांनी मंडप उभारल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न यावर्षीही ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी विनापरवाना उभारणार्या, तसेच परवानगी घेतल्यानंतर अटी व शर्तींचे पालन न केलेल्या सार्वजनिक मंडळांचे मंडप यंदा उभे राहू देऊ नये, अशा सूचना न्यायालयाने पालिकांना दिल्या आहेत.तसेच उच्च न्यायालयाने राज्यांतील सर्वच महापालिकांना त्यांच्या हद्दित मंडप धोरण ठरवण्याचे आदेश दिले आहेत.
वसई-विरार महानगरपालिकेच्या बोटचेप्या धोरणामुळे गणेशोत्सव मंडळांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून उत्सव साजरा करण्याची परंपरा’ यंदाही वसई-विरार मध्ये कायम राहाण्याची चिन्हे असून नियम मोडणार्यांमध्ये राजकीय नेत्यांनी यंदाही आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात ‘दै. चौफेर संघर्ष’ने वसई-विरार महानगर पालिकेचे आयुक्त सतिष लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते पुर्णपणे पाळले जातील. ज्या मंडळांनी मागील वर्षी अटी व शर्तींचे पालन केले नाही त्यांना मंडप उभारु देणार नाही. जे जे माननीय उच्च न्यायालयाचे प्रचलित नियम व आदेश असतील त्याप्रमाणे कारवाई होईल.”
रस्ते अडवून, वाहतुकीला अडथळा करून उत्सव साजरे करण्यात वसईतील वेगवेगळी उत्सव मंडळे सुरुवातीपासून अग्रेसर राहिली आहेत. दहिहंडी उत्सवात आवाजाचा दणदणाट करायचा, गणेशोत्सवात रस्ते, चौक अडवून मंडपे उभारायची, असे प्रकार वसईकरांना नवे नाहीत. वसई शहरातील काही रस्ते मुळात अरुंद असल्यामुळे अनेक ठिकाणी या रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव नाही. वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसला आहे. असे असताना वसई शहरातील वेगवेगळ्या भागांत रस्ते अडवून उत्सव साजरे करण्यात येत असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू लागल्याचे चित्र आहे. न्यायालयाने रस्त्यावर उत्सव साजरे करण्यासंबंधी काही र्निबध घातले असून त्याचे उल्लंघन सर्रासपणे गणेशोत्सव मंडळांकडून होताना दिसून येते. न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या एकतृतीयांश जागेवर गणेशोत्सव मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून मंडळांना देण्यात येते. अनेक गणेशोत्सव मंडळे एकतृतीयांशपेक्षा जास्त जागेवर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. तसेच विद्युत रोषणाईसाठी नवेकोरे रस्ते खोदतात. असे चित्र यंदाही शहरात दिसून येत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
............................................................................................
“उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते पुर्णपणे पाळले जातील. ज्या मंडळांनी मागील वर्षी अटी व शर्तींचे पालन केले नाही त्यांना मंडप उभारु देणार नाही. जे जे माननीय उच्च न्यायालयाचे प्रचलित नियम व आदेश असतील त्याप्रमाणे कारवाई होईल.”
-सतिश लोखंडे
आयुक्त, वसई विरार महानगर पालिका
“पोलीस पालिकेची परवानगी पाहिल्यानंतरच नहरकत प्रमाणपत्र देतात तसेच पोलीस फक्त लाऊडस्पिकरची परवानगी देत असतात. मुळात जेथे मंडप बांधले जातात ती जागा पालिकेची असते. त्यामुळे सर्व प्रथम जबाबदारी ही पालिकेची असते. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”
-प्रकाश बिराजदार
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, तुळिंज पोलीस ठाणे
............................................................................................
पदपथ अडवणारे मंडप नकोच
‘रस्ते, पदपथांची अडवणूक करणार्या उत्सवी मंडपांना परवानगी देण्यात येऊ नये’, असेही न्यायालयाने पुन्हा एकदा बजावले. ‘संबंधित यंत्रणेच्या परवानगीशिवाय आयोजकांनी उत्सवी मंडप उभे करु नयेत, त्यासाठी खड्डे खणू नयेत वा उत्सवादरम्यान व्यावसायिक जाहिराती प्रसिद्ध करु नयेत’, असे न्यायालयाने बजावले आहे.
त्या अधिकार्यांवर कारवाई करा : न्यायालय
‘ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून त्यांच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरणार्या अधिकार्यांवर सरकारने कारवाई करावी’, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. याशिवाय ‘मशिदींवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकारच असल्याचे सांगत सामान्य माणसाच्या शांततापूर्ण झोपेचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही आणि हे न्यायतत्व सर्वांसाठी तेवढेच लागू आहे.’, याचा न्यायालयाने पुनरुच्चार केला.
Monday, 25 July 2016
वसईकरांना खाद्य पदार्थ लागेना गोड!
वसई विरार महानगपालिकेला स्थापन होऊन तब्बल 7 वर्षे होऊन एकही खाद्य पदार्थ दुकानांचा सर्वे नाही!अस्वच्छ मिठाई दुकानांवर एफडीएची नजर जाणार का?
पालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याबाबतीत उदासीन!
कुणाल जाधव
8976629534
वसई : अस्वच्छतेमुळे नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स’ या दुकानातील खाद्य विक्रीवर एफडीएने बंदी घातली आहे. अशी कारवाई वसईतील स्वीट्स मार्ट वर कधी होणार... वसईमध्ये आज प्रत्येक नाक्यावर स्विटमार्ट आहेत. पण यातील एकाही स्वीटमार्ट कडे पालिकेने कधी लक्ष दिले नाही... वसई महानगपालिकेला 7 वर्षे पुर्ण होऊनही आज पालिकेकडे फुड इंन्सपेक्टर नाही. पावसाळ्यात वसई-विरारमध्ये अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. या संदर्भात पालिका उदासीन दिसत आहे.
यासंदर्भात ‘दै. चौफेर संघर्ष’ने आरोग्य विभागातील एका अधिकार्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, “वसई-विरार महानगरपालिकेकडून आज पर्यत कधीच असा सर्वे झाला नाही. पालिकडे फुड इन्सपेक्टरच नाही आहे. त्यासाठी फुड इन्सपेक्टरची गरज आहे. ‘मावा’ खराब आहे किंवा ‘मिठाई’ खराब आहे हे आम्ही सांगू नाही शकणार. त्यासाठी दिड वर्षाचे प्रशिक्षण असते आणि असे प्रशिक्षण कोणी घेतलेले नाही. आम्हाला अजुन तशा काही सुचना ही नाही आल्यात आज पर्यत आणि आम्ही असा सर्वे कधी केला नाही”
समोरून चांगल्या दिसणार्या दुकानांना खवयय्ये नेहमीच भेट देतात. अनेक दुकानांमध्ये खाण्याचे पदार्थ सजवून ठेवलेले असतात. पण हे पदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तिथे मात्र नियमाची खुलेआमपणे पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात दूषित अन्नपदार्थातून आजार पसरतात. सर्वाना चांगले, हेल्दी खाणे मिळावे यासाठी एफडीए दुकानाची पाहणी करत आहे. या पाहणीत नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स या दुकानाचे हे वास्तव समोर आले आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज समोरील बिकानेर स्वीट्सच्या दुकानातील स्वयंपाकघरात अतिशय अस्वच्छता असून अशा वातावरणात बनलेले अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचमुळे एफडीएने या दुकानावर कारवाई करत त्यांना अन्नपदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. पुढच्या काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत त्यामुळे हि कारवाई सुरु केली असल्याचे नवी मुंबई एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.
“वसई-विरार महानगरपालिकेकडून आज पर्यत कधीच असा सर्वे झाला नाही. पालिकडे फुड इन्सपेक्टरच नाही आहे. त्यासाठी फुड इन्सपेक्टरची गरज आहे. ‘मावा’ खराब आहे किंवा ‘मिठाई’ खराब आहे हे आम्ही सांगू नाही शकणार. त्यासाठी दिड वर्षाचे प्रशिक्षण असते आणि असे प्रशिक्षण कोणी घेतलेले नाही. आम्हाला अजुन तशा काही सुचना ही नाही आल्यात आज पर्यत आणि आम्ही असा सर्वे कधी केला नाही”
जितेंद्र नाईक
आरोग्य अधिकारी
वसई विरार महानगर पालिका
“पालिकेचे जे आज काम चालले आहे. ते अक्षरश: बहुजन विकास आघाडी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीसारखे काम चालू आहे. ज्या कामातून पैसा भेटेल अशाच कामाकडे लक्ष देणे...! असा प्रकार चालू आहे. ‘आम्ही करु सो कायदा!’ असे वातावरण महानगर पालिकेत पहावयास मिळते. पालिका व सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीला लोकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही”
उत्तम कुमार
अध्यक्ष
भारतीय जनता पार्टी (वसई रोड)
“मी विरोधी पक्ष नेता असताना या संदर्भात एक वर्षापुर्वी आयुक्तांना पत्र दिले होते. एफडीए चे कार्यालय ठाण्याला असुन तेथील तेथील एकच अधिकारी सर्व काम संभाळतो. त्यांची ताकद इतकी अपुरी आहे की, वसईत अनेक पाण्याच्या बेकायदेशीर फॅकटरी आहेत. अशुध्द पाणी नागरीकांना पाजले जात आहे. तसे पत्र ही मी आयुक्तांना दिले होते. त्यावेळी मी मागणी केली होती की, पालिकेचाच एक अधिकारी एफडीएवर असावा अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात मी पाठपुरावाही केला होता. त्यांसदर्भात मी मंत्री सुभाष देसाईंना ही भेटलो होतो. या संदर्भा पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.”
विनायक निकम
माजी विरोधी पक्ष नेता
“गेल्या 7 वर्षात सर्वे झाला की नाही मला माहिती नाही, पण यावेळी आम्ही प्रभाग आय मध्ये प्रत्येक हॉटेल व मिठाई खाद्यपदार्थ दुकानांना पावसाळ्यासंदर्भात घ्यावयाच्या काळजी संदर्भात नोटीस पाठवल्या असून त्यासंदर्भात आमचे एस आय विकास पाटील वेळोवेळी पहाणी करत असतात”
प्रविण शेट्टी
सभापती (प्रभाग आय)
Sunday, 24 July 2016
वसईकरांना मिठाई लागेना गोड!
अस्वच्छ मिठाई दुकानांवर एफडीएची नजर जाणार का?
पालिका विभागाला जाग कधी येणार?
कुणाल जाधव
8976629534
वसई : अस्वच्छतेमुळे नवी मुंबईतील ‘बिकानेर स्वीट्स’ या दुकानातील खाद्य विक्रीवर एफडीएने बंदी घातली आहे. अशी कारवाई वसईतील स्वीट्स मार्ट वर कधी होणार.. वसईमध्ये आज प्रत्येक नाक्यावर स्विटमार्ट आहेत. पण यातील एकाही स्वीटमार्ट कडे पालिकेने कधी लक्ष दिले नाही... वसई-विरार महानगरपालिकेकडे अनधिकृत बांधकाम या विषया शिवाय कोणता विषय नाहीच असे कोणी ही सांगेल. या पावसाळ्यात वसई-विरारमध्ये अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. या संदर्भात पालिका वसईतील स्वीट्स मार्टस च्या दुकांनाची पहाणी करणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये सतावत आहे.
समोरून चांगल्या दिसणार्या दुकानांना खवयय्ये नेहमीच भेट देतात. अनेक दुकानांमध्ये खाण्याचे पदार्थ सजवून ठेवलेले असतात. पण हे पदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तिथे मात्र नियमाची खुलेआमपणे पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात दूषित अन्नपदार्थातून आजार पसरतात. सर्वाना चांगले, हेल्दी खाणे मिळावे यासाठी एफडीए दुकानाची पाहणी करत आहे. या पाहणीत नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स या दुकानाचे हे वास्तव समोर आले आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज समोरील बिकानेर स्वीट्सच्या दुकानातील स्वयंपाकघरात अतिशय अस्वच्छता असून अशा वातावरणात बनलेले अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचमुळे एफडीएने या दुकानावर कारवाई करत त्यांना अन्नपदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. पुढच्या काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत त्यामुळे हि कारवाई सुरु केली असल्याचे नवी मुंबई एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)






