Thursday 13 October 2016

वसई-विरार महानगरपालिकेच्या खाजगी बसेसना
परिवहन मंत्र्यांचा रेड सिग्नल
परिवहन मंत्र्यांची खाजगी बसेसवर करडीनजर 
वसई-विरार मनपाच्या खाजगी ठेकेदारांची पळताभुई
कुणाल जाधव
मुंबई : वसई-विरार महानगरपालिकेमार्फत खाजगी ठेकेदारांनी सुरु केलेल्या बसेस सेवा बंद करण्यात येर्दल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या खाजगी ठेकेदारांमध्ये काही राजकीय काही राजकीय नेत्यांचे अप्रत्यक्षपणे हित असल्याचे त्यांनी संशय व्यक्त केला आहे. मंत्री रावते जसे बोलतात ते करून दाखवतात त्यामुळे खाजगी ठेकेदारांची चांगलीच पळताभुई झाली आहे.

        वसई तालुक्यातील गेली 60 वर्षे राज्य परिवहन महामंडळाची परिवहन सेवा चालू आहे. विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी महामंडळाची परिवहनाची सेवा म्हणजे एक वरदान आहे. विशेष म्हणजे खाजगी बसेस मधून सेवा करण्यापेक्षा स्त्रियांना महामंडळाच्या बसेसमधून प्रवास सुरक्षित वाटते. यामुळे गावकर्‍यांनी राज्य परिवहनच्या बसेस चालू करण्याची मागणी केल्याने परिवहन मंत्र्यांनी या खाजगी बसेस हटविण्याचा विडा उचलला आहे.
       वसई-विरार भागातील काही गावे महानगर पालिकेतून वगळल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या मागणीनुसार महाराष्ट्र परिवहन महामंडळाची नालासोपारा आगारातून 16 बसेस आणि वसई आगारातून नऊ बसेस सुरु आहेत. ज्या मार्गावरून बसेस चालू आहेत त्या मार्गावरील काही गावे ग्रामपंचायत हद्दीतच आहेत.
नालासोपारा व वसई आगारातून लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी बसेस सेवा पुरविल्या जातात. परंतु आगारातील काही प्रमाणातील जागा भाड्याने देण्यासाठी वसई-विरार महानगर पालिकेने राज्य सरकारकडे मागणी केल्याने एस.टी. सेवा कालांतरोन हद्दपार होण्याची भिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतील. याकडे नालासोपारा व वसईतील काही सामाजिक संस्थांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे लक्ष वेधले आहे.