Wednesday 28 December 2016

पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात वसईकर करणार नववर्षाचे वेलकम!
पालघर पोलीस कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज
  • एक दिवसाचा मद्य परवाना न देण्याचा निर्णय -चंद्रशेखर बावनकुळे
  • वसईत पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त 
  • महिलांच्या सेवेसाठी दामिनी पथक
कुणाल जाधव
वसई : थर्टी फस्टला ‘झिंगाट’ होऊन पार्टी करण्याचा विचार करणार्‍या तळीरामांचे यंदाच्या थर्टी फस्ट पार्टीचे वांधे होणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 31 डिसेंबर रोजी एक दिवसाचा मद्य परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जे थर्टी फस्टची ‘झिंगणारी’ पार्टी करण्याचे बेत आखत त्यांना हा निराशा देणारा निर्णय ठरणार आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच वसई तालुक्यातील पोलीसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगलीच कमर कसली असल्याने थर्टी फस्टला ‘झिंगाट’ होऊन पार्टी करण्याचा विचार करणार्‍या तळीरामांचे यंदाच्या थर्टी फस्ट पार्टीचे वांधे होणार आहेत. यासंदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी सर्व पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून तसे आदेश सर्व पोलीस स्टेशनना दिले आहेत.   
राज्यातील वाढते रस्ते अपघात विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्पादन शुल्क विभागाने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांच्या 500 मीटरच्या आत मद्यविक्री, मद्य उत्पादन व दुकानांची जाहिरात करण्यावर बंदी घातली आहे. महानगरपालिका, शहर, गाव किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या हद्दीतून महामार्ग जात असल्यास तेथेही बंदी लागू होणार आहे. तसेच 31 मार्च 2017 पासून मद्यविक्री परवान्यांचे नुतनीकरण न करण्याचा निर्णयापाठोपाठ आता थर्टी फस्टच्या रात्री एक दिवसाचा मद्यसेवन परवाना न देण्याचा निर्णय घेऊन उत्पादन शुल्क विभागाने तळीरामांची झिंग उतरवली आहे. थर्टी फस्टचे लोण आता शहरी भागातून ग्रामीण भागाकडे पसरले आहे.
यासंदर्भात ‘दै. चौफेर संघर्ष’ने वसईतील सुवी पॅलेसचे मालक विजय पाटील यांना विचारले असता त्यांनी याचा जास्त फटका जे स्वतः जागा घेऊन पार्टीचे आयोजन करतात त्यांना होणार आहे. बड्या हॉटेलना याचा तेवढा फरक पढणार नाही. तसेच तेथे येणार गर्दीही पारिवारीक असते त्यामुळे त्याचा एवढा परिणाम बड्या हॉटेल्सना होणार नाही. असे त्यांनी सांगितले
वसई शहरात मोठ्या प्रमाणावर थर्टी फर्स्टच्या पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. तसेच, 31 डिसेंबरच्या रात्री तरुणाई महामार्गावरील धाबे, हॉटेल्स व क्लबमध्ये जंगी पार्ट्या आयोजित करतात. या पार्ट्यांमध्ये मुख्यत्वे मद्याचे ग्लास रिचवले जातात. मद्यसेवन करुन वाहने चालविल्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत थर्टीफस्टच्या रात्री जादा अपघात होतात. त्यामुळे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 31 डिसेंबरला एक दिवसाचा मद्यसेवन परवाना देऊ नये, असे आदेश या विभागाच्या सर्व अधीक्षकांना दिले आहेत. 
या आदेशाचा सर्वाधिक फटका महामार्गालगत असलेल्या क्लब आणि पंचतारांकित हॉटेल्सना बसणार आहे. या दिवशी तरुणाईच्या पार्ट्या याच ठिकाणी होत असल्यामुळे त्यांना आपला मोर्चा शहराबाहेर वळवावा लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क विभाग 31 डिसेंबरच्या रात्री महामार्गांलगतचे वाईन शॉप, देशी दारु दुकाने, विदेशी मद्यविक्री दुकाने, धाबे आणि हॉटेल्सवर नजर ठेवणार आहे. यामुळे वसईत ‘झिंगुन’ थर्टी फस्ट साजरे करणार्‍या तळीरामांच्या उत्साहावर यंदा विरजण पडले आहे. 
--------------------------------------------------------------------------------
मद्यसेवन करुन वाहने चालविल्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत थर्टीफस्टच्या रात्री जादा अपघात होतात. त्यामुळे 31 डिसेंबरला एक दिवसाचा मद्यसेवन परवाना देऊ नये.
चंद्रशेखर बावनकुळे, उत्पादन शुल्क मंत्री

तुळिंज पोलीस स्टेशन 20 अधिकारी 90 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत फायरब्रिगेट नाका, अचोळा नाका, संतोषभुवन, प्रगतीनगर, चंदन नाका अशा पाच ठिकाणी नाकाबंदी करणार आहेत सहाय्यक पोलीस निरिक्षक राणी पुरी यांच्या अंतर्गत महिलांच्या सेवेसाठी पथक फिरणार आहे. विशेष करुन अपघात होऊ नयेत म्हणुन ‘ड्रिंक एन्ड ड्राईव्ह’ वर तात्काळ गुन्हा दाखल केले जाणार आहेत. 
प्रकाश बिराजदार
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, तुळिंज पोलीस स्टेशन

कायद्याच्या चौकटीत राहून नवर्षाचे स्वागत करा. वसईत आमच्या हद्दीत असलेल्या सनसिटी व पंचवटी नाका 7 अधिकारी व 40 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत येथे नाका बंदी करण्यात येणार आहे. खास करून ‘ड्रिंक एन्ड ड्राईव्ह’वर आमची नजर राहणार आहे. जेणे करुन अपघात कमी होतील.
अनिल पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, माणिकपूर पोलीस स्टेशन

वसई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाभोळा व एसटी डेपो अशा 2 ठिकाणी नाका बंदी ठेवण्यात येणार आहे. माझे 5 अधिकारी 25 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत ही नाकाबंदी करण्यात येणार आहे. ‘ड्रिंक एन्ड ड्राईव्ह’ साठी माझी स्वता सिविल ड्रेस मध्ये अधिकारी व तात्काळ गुन्हे दाखल करणार आहोत. वसई किल्ल्याचा भाग व सुरुची बाग हा संवेदनशील असल्याने आमची तेथे खास करुन नजर राहणार आहे. तसेच गरज पडल्यास (आरसीपी) दंगल नियंत्रण पथकाचे जवान मागवणार आहे. 
संपद पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वसई पोलीस स्टेशन

वालिव पोलीस स्टेशन 12 अधिकारी 100 कर्मचार्‍यांबरोबर रेंज ऑफिस नाका, वसई फाटा, सातिवली अशा तीन ठिकाणी नाकाबंदी करणार आहेत. मी स्वतः जातिने या नाक्यांवर उपस्थित राहुन लक्ष देणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वालिव पोलीस स्टेशन खबरदारी घेणार आहे.
महेश पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वालिव पोलीस स्टेशन

6 अधिकारी 38 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत ही नाकाबंदी करण्यात येणार आहे. नालासोपारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली नाका, धनंजय नाका, पाटणकर पार्क, हेगवार चौक, गास नाका, सिव्हीक सेंटर अशा 6 ठिकाणी नाका बंदी ठेवण्यात येणार आहे.  ‘ड्रिंक एन्ड ड्राईव्ह’ साठी आमची खास करुन नजर राहणार आहे.
रविंद्र बडगुजर
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, नालासोपारा पोलीस स्टेशन
--------------------------------------------------------------------------------------
तुळींज पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
फायरब्रिगेट नाका, अचोळा नाका, संतोषभुवन, प्रगतीनगर, चंदन नाका

माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
सनसिटी नाका, पंचवटी नाका

वसई पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
बाभोळा नाका, एसटी डेपो नाका

वालिव पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
रेंज ऑफिस नाका, वसई फाटा नाका, सातिवली नाका

नालासोपारा पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
वाघोली नाका, धनंजय नाका, पाटणकर पार्क, हेगवार चौक, गास नाका, सिव्हीक सेंटर

Monday 12 December 2016


Assistant Police Inspector Rani Puri with Kunal Jadhav


Senior Police Inspector shri. Anil patil with Kunal Jadhav




Senior Police Inspector shri. Prakash Birajdaar with Kunal Jadhav