Monday 25 July 2016

वसईकरांना खाद्य पदार्थ लागेना गोड!
वसई विरार महानगपालिकेला स्थापन होऊन तब्बल 7 वर्षे होऊन एकही खाद्य पदार्थ दुकानांचा सर्वे नाही!
अस्वच्छ मिठाई दुकानांवर एफडीएची नजर जाणार का?
पालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याबाबतीत उदासीन!

कुणाल जाधव
8976629534

वसई : अस्वच्छतेमुळे नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स’ या दुकानातील खाद्य विक्रीवर एफडीएने बंदी घातली आहे. अशी कारवाई वसईतील स्वीट्स मार्ट वर कधी होणार... वसईमध्ये आज प्रत्येक नाक्यावर स्विटमार्ट आहेत. पण यातील एकाही स्वीटमार्ट कडे पालिकेने कधी लक्ष दिले नाही... वसई महानगपालिकेला 7 वर्षे पुर्ण होऊनही आज पालिकेकडे फुड इंन्सपेक्टर नाही. पावसाळ्यात वसई-विरारमध्ये अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. या संदर्भात पालिका उदासीन दिसत आहे.

यासंदर्भात ‘दै. चौफेर संघर्ष’ने आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, “वसई-विरार महानगरपालिकेकडून आज पर्यत कधीच असा सर्वे झाला नाही. पालिकडे फुड इन्सपेक्टरच नाही आहे. त्यासाठी फुड इन्सपेक्टरची गरज आहे. ‘मावा’ खराब आहे किंवा ‘मिठाई’ खराब आहे हे आम्ही सांगू नाही शकणार. त्यासाठी दिड वर्षाचे प्रशिक्षण असते आणि असे प्रशिक्षण कोणी घेतलेले नाही. आम्हाला अजुन तशा काही सुचना ही नाही आल्यात आज पर्यत आणि आम्ही असा सर्वे कधी केला नाही”
समोरून चांगल्या दिसणार्‍या दुकानांना खवयय्ये नेहमीच भेट देतात. अनेक दुकानांमध्ये खाण्याचे पदार्थ सजवून ठेवलेले असतात. पण हे पदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तिथे मात्र नियमाची खुलेआमपणे पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात दूषित अन्नपदार्थातून आजार पसरतात.  सर्वाना चांगले, हेल्दी खाणे मिळावे यासाठी एफडीए दुकानाची पाहणी करत आहे. या पाहणीत नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स या दुकानाचे हे वास्तव समोर आले आहे.  
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज समोरील बिकानेर स्वीट्सच्या दुकानातील स्वयंपाकघरात अतिशय अस्वच्छता असून अशा वातावरणात बनलेले अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचमुळे एफडीएने या दुकानावर कारवाई करत त्यांना अन्नपदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. पुढच्या काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत त्यामुळे हि कारवाई सुरु केली असल्याचे नवी मुंबई एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.

वसई-विरार महानगरपालिकेकडून आज पर्यत कधीच असा सर्वे झाला नाही. पालिकडे फुड इन्सपेक्टरच नाही आहे. त्यासाठी फुड इन्सपेक्टरची गरज आहे. ‘मावा’ खराब आहे किंवा ‘मिठाई’ खराब आहे हे आम्ही सांगू नाही शकणार. त्यासाठी दिड वर्षाचे प्रशिक्षण असते आणि असे प्रशिक्षण कोणी घेतलेले नाही. आम्हाला अजुन तशा काही सुचना ही नाही आल्यात आज पर्यत आणि आम्ही असा सर्वे कधी केला नाही
जितेंद्र नाईक
आरोग्य अधिकारी
वसई विरार महानगर पालिका

पालिकेचे जे आज काम चालले आहे. ते अक्षरश: बहुजन विकास आघाडी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीसारखे काम चालू आहे. ज्या कामातून पैसा भेटेल अशाच कामाकडे लक्ष देणे...! असा प्रकार चालू आहे. ‘आम्ही करु सो कायदा!’ असे वातावरण महानगर पालिकेत पहावयास मिळते. पालिका व सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीला लोकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही
उत्तम कुमार
अध्यक्ष
भारतीय जनता पार्टी (वसई रोड)


मी विरोधी पक्ष नेता असताना या संदर्भात एक वर्षापुर्वी आयुक्तांना पत्र दिले होते. एफडीए चे कार्यालय ठाण्याला असुन तेथील तेथील एकच अधिकारी सर्व काम संभाळतो. त्यांची ताकद इतकी अपुरी आहे की, वसईत अनेक पाण्याच्या बेकायदेशीर फॅकटरी आहेत. अशुध्द पाणी नागरीकांना पाजले जात आहे. तसे पत्र ही मी आयुक्तांना दिले होते. त्यावेळी मी मागणी केली होती की, पालिकेचाच एक अधिकारी एफडीएवर असावा अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात मी पाठपुरावाही केला होता. त्यांसदर्भात मी मंत्री सुभाष देसाईंना ही भेटलो होतो. या संदर्भा पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.
विनायक निकम
माजी विरोधी पक्ष नेता


गेल्या 7 वर्षात सर्वे झाला की नाही मला माहिती नाही, पण यावेळी आम्ही प्रभाग आय मध्ये प्रत्येक हॉटेल व मिठाई खाद्यपदार्थ दुकानांना पावसाळ्यासंदर्भात घ्यावयाच्या काळजी संदर्भात नोटीस पाठवल्या असून त्यासंदर्भात आमचे एस आय विकास पाटील वेळोवेळी पहाणी करत असतात
प्रविण शेट्टी
सभापती (प्रभाग आय)

No comments:

Post a Comment