Sunday 24 July 2016

वसईकरांना मिठाई लागेना गोड!

अस्वच्छ मिठाई दुकानांवर एफडीएची नजर जाणार का?
पालिका विभागाला जाग कधी येणार?

कुणाल जाधव
8976629534



वसई : अस्वच्छतेमुळे नवी मुंबईतील ‘बिकानेर स्वीट्स’ या दुकानातील खाद्य विक्रीवर एफडीएने बंदी घातली आहे. अशी कारवाई वसईतील स्वीट्स मार्ट वर कधी होणार.. वसईमध्ये आज प्रत्येक नाक्यावर स्विटमार्ट आहेत. पण यातील एकाही स्वीटमार्ट कडे पालिकेने कधी लक्ष दिले नाही... वसई-विरार महानगरपालिकेकडे अनधिकृत बांधकाम या विषया शिवाय कोणता विषय नाहीच असे कोणी ही सांगेल. या पावसाळ्यात वसई-विरारमध्ये अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. या संदर्भात पालिका वसईतील स्वीट्स मार्टस च्या दुकांनाची पहाणी करणार का असा प्रश्‍न नागरिकांमध्ये सतावत आहे.

समोरून चांगल्या दिसणार्‍या दुकानांना खवयय्ये नेहमीच भेट देतात. अनेक दुकानांमध्ये खाण्याचे पदार्थ सजवून ठेवलेले असतात. पण हे पदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तिथे मात्र नियमाची खुलेआमपणे पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात दूषित अन्नपदार्थातून आजार पसरतात.  सर्वाना चांगले, हेल्दी खाणे मिळावे यासाठी एफडीए दुकानाची पाहणी करत आहे. या पाहणीत नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स या दुकानाचे हे वास्तव समोर आले आहे.  
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज समोरील बिकानेर स्वीट्सच्या दुकानातील स्वयंपाकघरात अतिशय अस्वच्छता असून अशा वातावरणात बनलेले अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचमुळे एफडीएने या दुकानावर कारवाई करत त्यांना अन्नपदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. पुढच्या काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत त्यामुळे हि कारवाई सुरु केली असल्याचे नवी मुंबई एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment