Monday 4 July 2016

वसईत मॉडेलिंगच्या आमिषाने बलात्कार करणार्‍याला अटक
मोठ्या शिताफिने तुळींज पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश

कुणाल जाधव
8976629534

वसई ः मॉडेलिंगचे आमिष दाखवून अनेक तरुणींवर बलात्कार करणार्‍या एका युवकाला अटक करण्यास तुळींज पोलिसांना अखेर यश आले आहे. तुळींज पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रकाश बिराजदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मोठ्या शिताफीने या नराधमाची धरपकड केली. संदीप यादव असे या आरोपीचे नाव आहे. 
वेगवेगळ्या नावाने तो फेसबूकवर अकाऊंट चालवत असल्याची तक्रारही त्याच्याविरोधात आहे. आरोपी संदीप हा अनेक फेसबुकचे अकाऊंट चालवत होता. फेसबुकवरुन तो तरुणींशी संपर्क साधायचा व त्यांना मॉडेलिंगचे आमिष दाखवायचा. तो युवतींना फोटोशूटसाठी समुद्र किनार्‍यावर बोलवून घ्यायचा.
समुद्र किनार्‍यावर खाण्याच्या बहाण्याने तो मुलींना गुंगीचे औषध द्यायचा. त्यानंतर तरुणींचे न्यूड फोटोशूट करुन त्यांच्यावर बलात्कार करायचा. मात्र अखेर त्याच्या पापाचा घडा भरलाच आणि त्याच्या या काळ्या कृत्याचा एका युवतीने पर्दाफाश केला. युवतीने मॉडेल बनायचे सांगून संदीपला बोलावून घेतले. प्लॅननुसार त्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवले. मॉडेलिंगचे आमिष दाखवून
या नराधमास पकडण्याची संपूर्ण कारवाई तुळींज पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे सगळ्याच पीडित मुलींना न्याय मिळाला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात या नराधमाला बळी जाण्यापासून अनेक मुली बचावल्या आहेत.
तरुणींची आर्थिक फसवणूक व लैंगिक शोषण करणारा 25 वर्षीय आरोपी संदीप यादव हा नालासोपारा येथे राहातो. मुलींच्या अश्‍लील चित्रफिती इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देत तो मुलींना ब्लॅकमेल करत होता. दोन मुलींच्या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांना त्याला बलात्कार, फसवणूक, सायबर अ‍ॅक्ट, पोक्सो आदी गुन्ह्यांतर्गत अटक केली आहे. 

''

मुंबईसारख्या झगमगत्या चित्रनगरीची भुरळ पडून अनेक जण आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येत असतात. मात्र येथे चित्रपटाच्या नावाने फसवणार्‍यांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे सिनेसृष्टीत काम करायला येणार्‍यांनी योग्य ती माहिती काढूनच, आपल्या कुटुंबियांना याबाबत इत्यंभूत कल्पना देऊनच काम करावे.
-प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, तुळिंज पोलीस स्टेशन

''

No comments:

Post a Comment