Friday 24 June 2016

वसईत गोमांस पकडलेल्या तिन्ही गुन्हेगारांना जामिन मंजूर

पोलीस स्टेशनचा तपास संथ गतिने
भाजपा व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांबाबतीत आंदोलन करणार
खासदार चिंतामण वनगा 1 जुन रोजी माणिकपूर पोलीस स्टेशनला भेट देणार

कुणाल जाधव
8976629534

वसई : राज्यात गोहत्या बंदी असतानाही वसईमध्ये दिनांक 15 मे रोजी शनिवारी गोमांसाची वाहतूक करणारा एम. एच. 01. एलए. 3808 या क्रमांकाचा टेंपो पकडला गेला होता. काही जागरूक नागरिकांनी हा टेंपो पकडून दिला यावेळी पोलीसांनी चार आरोपीं पैकी तीन आरोपींना अटक केली होती. परंतू तिन्ही गुन्हेगारांना जामिन मंजूर झाला आहे. तसेच अजुन तपासात टेंपो कुठुन आला होते. कोणता कत्तल खाना होता हे ही पोलीस शोधू शकलेले नाहीत. यासंदर्भात माणिकपूर पोलीस स्टेशनच्या संथ चौकशीवर भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार आहे अशी माहिती वसई रोेडचे भाजपा अध्यक्ष उत्तम कुमार यांनी सांगितले. याप्रकरणा संदर्भाथ पालघर जिल्हयाचे खासदार चिंतामन वनगा माणिकपूर पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. हि घटना सकाळच्या सुमारास झाली होती. वसईतील अंबाडी रोड, पंचवटी नाक्यावर हा टेंपो पकडण्यात आला होता.


माणिकपूर पोलीस स्टेशन कलम 5 अ ब क, 6 व 9 या कलमांखाली गुन्हा दाखल करुन अटक केली होती त्यातील तिनही आरोपींना जामिन मंजूर झाला आहे. यासंदर्भात ‘दै.चौफेर संघर्ष’ने तपास अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “तिघांनाही जामिन भेटला आहे. चौकशी चालू आहे. आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनला त्या तिघांना हजेरी लावली आहे. नेमके हे मास कुठुन आणले आहे कुठे घेऊन जात होते याचा तपास चालू आहे. सध्या काही नाही! चौकशी चालू आहे. आपल्याकडे अजुन तेवढे पुरावे नाहीत.” असे त्यांनी सांगितले. फरार आरोपी संदर्भात विचारले असता ‘तिनही आरोपी चौथा नव्हता असे सांगतात’ असे पोलीसांनी सांगितले.
अख्तर अब्बास शेख (रा. काशिमिरा), मोहमद ईस्माईल कुरेशी (रा. दांडगेवाडी, गास) व बशिर अहमद अब्दूल कादीर कुरेशी (रा. दांडगेवाडी, गास) असे गुन्हेगारांची नावे होती तर फरार आरोपीचे नाव फिरोज फौजी (रा. वाझा मोहल्ला, सोपारा) असे आहे.

.................................................................

तिघांनाही जामिन भेटला आहे. चौकशी चालू आहे. आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनला त्या तिघांना हजेरी लावली आहे. नेमके हे मास कुठुन आणले आहे कुठे घेऊन जात होते याचा तपास चालू आहे. सध्या काही नाही चौकशी चालू आहे.आपल्याकडे अजुन तेवढा पुरावा नाही. आम्ही जे संपुर्ण पुराव्यासहीत चार्जशीट त्यांच्यावर टाकणार आहोत त्यात थोडीही हयगय करणार नाही.
-शिंदे
सहाय्यक पोलीस निरिक्षक, माणिकपूर पोलीस स्टेशन

....................................................................................

या प्रकरणावर सशक्त कारवाई झाली पाहिजे. माणिकपूर पोलीस स्टेशनने ह्या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे यासाठी आमचा पक्ष व सर्व हिंदुत्ववादी संघटना सामिल होऊन तिव्र आंदोलन करणार आहे. यासंदर्भात पालघर जिल्ह्याचे खासदार चिंतमाण वनगा 1 जुन रोजी माणिकपूर पोलीस स्टेशनला भेटून या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
-उत्तम कुमार
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी (वसई रोड)


https://www.facebook.com/Kunal-Jadhav-108981482841014/

No comments:

Post a Comment