Friday 24 June 2016

वसईत शालेय पुस्तकांच्या नावावर विद्यार्थी-पालकांची बेसुमार लुट

खासगी पुस्तकांवर मनमानी किंमत लावून केली जाते विक्री
10 टक्के सवलतीच्या नावाने विद्यार्थी- पालकांची केली जातेय लूट
सरकारी आणि खासगी पुस्तकांच्या किंमतीत जमीन - आसमानची तफावत

कुणाल जाधव
8976629534

वसई :  मे महिन्याची सुट्टी आता संपत आली असून विद्यार्थ्यांना आता शाळेचे वेध लागले आहेत. हल्ली विद्यार्थ्यांना शाळेची बरीचशी साहित्य (शाळेचे कपडे, वह्या-पुस्तके) शाळेतच मिळत असल्याने बाजारातून विकत घेण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. मात्र विद्यार्थी आणि पालक पुस्तकांबाबतीत मात्र शाळांवर निराश असल्याचे दिसत आहेत.
शाळा सुरू होण्यासाठी अवघे 3 दिवस उरले असताना वसई शहरातील इंग्रजी शाळांबाबत काही खुलासे झाले आहेत. या शाळेद्वारा पुस्तकांबाबत विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. या शाळा सरकारी पुस्तकांना डावलून दुकानदारांशी हातमिळवणी करून पुस्तकांची मनमानी किंमत वाढवून पालकांची लूट करत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत पालकांनी संतापाची भावना व्यक्त केली आहे. 


या शाळा शाळेतूनच पुस्तक घेण्याच्या उद्देशाने दुकानदारांशी हातमिळवणी करून विद्यार्थी आणि पालकांची अक्षरशः लूट करत आहेत, असा आरोप पालकांकडून केला जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी पुस्तक न घेता दुकानदारांकडून पुस्तकं विकत घेत वाढीव किंमतीत विद्यार्थ्यांना पुस्तक विक्री शाळेकडून केली जाते. ज्यात कमीशन इतके असते की दुकानदार शाळेचे पोट भरल्यानंतरही आलेल्या कमीशनमधून ग्राहकांनी 10 टक्के दिले तरी त्याला 30 टक्के कमीशन सर्व खर्च काढून सहज मिळतात कारण ही सर्व पुस्तके मनु किंवा प्रदिपची असतात. फक्त त्यांच्या नावांमध्ये बदल केला जातो, ज्यात 80 टक्के कमीशन तर येते आणि त्याचबरोबर त्या पुस्तकावर मनमानी किंमत छापु शकतो. ही बाब स्वतःहून एका दुकानदाराने नाव न छापण्याच्या अटीवर उघड केले आहे. ही बाब उघडकीस आणणार्‍या दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी पुस्तकांवर फक्त 15 टक्के कमीशन मिळते ज्यात, 2-3 टक्के येण्या-जाण्याच्या प्रवासी खर्चात जातो आणि 13 टक्क्यांमधील दुकानाचा खर्च, कर्मचार्‍यांचा खर्च काढून फक्त 10 टक्के वाचतात. तेच खासगी पुस्तकांवर जवळजवळ 70 ते 80 टक्के कमीशन येते. त्यातील 10 टक्के ग्राहकांना देऊनही शाळेच्या कर्मचार्‍यांचा खर्च काढून 40 टक्के कमीशन सहजासहजी शिल्लक राहते. अशा प्रकारे दुकानदार खासगी पुस्तके सेटिंग करून देतात आणि शाळा त्या पुस्तकांवर आपली मनमानी किंमत छापून शाळेत विद्यार्थ्यांना विकते. 

कशा पद्धतीने चालतो कमीशनचा खेळ
दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ 4 महिने आधीपासून या गौडबंगालाला सुरूवात होते. खासगी शाळा दुकानदारांशी सेटिंग करून पुस्तकांचे सॅम्पल घेऊन पुस्तके मागवतात. दुकानदार त्याच सॅम्पलची पुस्तके शाळेत पाठवतो ज्याचे, जास्तीत जास्त कमीशन असेल आणि ज्याचे सहजतेने नाव आणि किंमत बदलता येईल. शाळा एक एक करुन सर्व दुकानदारांना शाळेत बोलावून लिस्ट देण्याच्या बदल्यात मोठ्ठी रक्कम वसूल करतात आणि जो जास्त फंड देईल त्यालाच ही लिस्ट लागू होते आणि त्याच पुस्तकाचे नाव बदलण्यात येते. 
दुकानदाराने जो फंड शाळेला दिला, त्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची किंमत दुप्पटीने वाढवून वसूल केला जातो. त्याचबरोबर पुस्तकावरील प्लास्टिकचे कवर बाजारात 7 रुपयाला मिळते ते शाळेत 20 रुपयाला दिले जाते. 
या शाळेत 10 टक्के सवलतीवर विद्यार्थ्यांना पुस्तके विकण्याचा फंडा आहे. जेणे करून विद्यार्थी- पालकांना वाटेल की शाळेत कमी किंमतीत पुस्तके विकली जातात. प्रत्यक्षात मात्र शाळेत दिल्या जाणार्‍या पुस्तकांचा आणि बाजारात त्याच पुस्तकांच्या किंमतीत जमीन- आसमानचा फरक जाणवतो.


https://www.facebook.com/Kunal-Jadhav-108981482841014/

No comments:

Post a Comment