Friday 24 June 2016

वसईत शासनाच्या मोफत शालेय पुस्तक वाटपाचा बोजवारा!

आठवी पर्यंतच्या 62 मराठी अनुदानीत शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देने बंधनकारक

कुणाल जाधव
8976629534

     
वसई :  उन्हाळी सुट्या संपत आल्या असून शाळा सुरू होण्याची तारीख जवळ येत आहे. शिक्षण खात्याने शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेला लागणारे शालेय साहित्य प्रत्येक तालुक्याच्या शिक्षण विभागाकडे सोपविले आहे. सर्व शिक्षा अभियाना-अंतर्गत आठवी पर्यंतच्या वसई तालुक्यातील 62 मराठी अनुदानीत शाळांतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके सर्व शाळांना पुरविण्यात आली असे पंचायत समितीच्या पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असून याची तयारी शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे असे पंचायत समितीच्या दवणे मॅडम यांनी सांगितले. मात्र हा लाभ सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले असुन त्यासंदर्भात राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.
वसई तालुक्यातील ए.व्ही.ए. संस्था प्रा. स्कूल, जॉन 23 मराठी आगाशी, के.जी. हायस्कूल आगाशी, सेंट.जेम्स प्रा. आगाशी, सेंट.जेम्स सेंकडरी आगाशी, सेंट.पीटर आर्नळा, आदर्श विद्यालय, बोळींज, सेंट.जोसेफ प्रा.स्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल एण्ड ज्यू.स्कूल, डॉ. नरु गवळणकर प्रा., डॉ.डी.जे. गवळणकर स्मारक विद्यामंदीर, व्ही.व्ही.ठाकूर व्ही. चंदनसार, सरस्वती विद्यालय, हॉली फॅमिली प्रा.भुईगाव, सेंट.गोंसालो गॅस, सेंट.गोंसालो हायस्कूल, बी.व्ही.वर्तक हायस्कूल नल्ले, हॉली क्रॉस प्रा. निर्मल, हॉली क्रॉस हायस्कूल निर्मल, निर्मल विद्यालय निर्मल, सेंट जोसेफ उमराळे, प्रतिभा विद्यामंदीर, रिशी वाल्मिकी सेंकडरी स्कूल, के बी पाटील विद्यालय, बी बी जाधव विद्यामंदीर, सेंट. थॉमस प्रायमरी स्कूल सँडर, सेंट.एलीझाबेथ प्रा. स्कूल, सेंट.एलीझाबेथ हायस्कूल, आर्च बीशॉप दीलीमा मार्सेस चर्च, सेंट.मॅरी मगादालेना मुळगाव, सेंट.फ्रां.झेव्हीअर विद्यालय गिरीज, सेंट.थॉमस हायस्कूल देवतळे, ज्ञानदीप विद्यामंदीर वालीव सेंकडरी, ए. विद्यालय, नारींगी, यू. विद्यालय प्रा. मराठी, यू. विद्यालया हायर सेंकडरी, ए.व्ही.स्मारक विद्यामंदीर प्रा., ए.व्ही.स्मारक विद्यामंदीर सेंकडरी, रामक्रीष्ण विद्यालय प्रायमरी, आर.पी.वाघ हायस्कूल, थॉमस बाप्तीस्ता प्रायमरी, थॉमस बाप्तीस्ता हायस्कूल, सेंट.अलोयस्यूस प्रायमरी, सेंट.अलोयस्यूस गर्ल्स हायस्कूल, सेंट.पीटर हायस्कूल, सेंट.पीटर चर्च प्रा.स्कूल, एन.डी. समामंत आदर्श स्कूल, के.बी.सी.आर.के. बालविद्याविहार, वसई, न्यू इंग्लिश स्कूल, निर्मला माता प्रायमरी स्कूल, एन.एम.गर्ल्स एच.एस. माणिकपूर, सेंट.झेव्हीयर्स एच.एस. माणिकपूर, सेंट. फिलोमिना प्रा. एस, माणिकपूर, ए व्ही ज्यूनिअर कॉलेज, अभिनव व्ही. प्रा. एस. वसई रोड, जी.जे. वर्तक एच.एस.वसई रोड, नुतन मराठी स्कूल, नूतन विद्यालय सेंकडरी मराठी, सोपारा इंग्लिश सेंकडरी, तुळींज एज्युकेशन ट्रस्ट मराठी प्रा. स्कूल, के.एम.पी.डी.मराठी स्कूल, राजा शिवाजी प्रायमरी या 62 मराठी अनुदानीत शाळांमध्ये शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेश देण्यात आले आहेत.
तर, अनेक इंग्रजी शाळांनी स्वत: शालेय वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या असून पालकांनी शाळेतूनच वस्तू खरेदी करण्याचा आग्रह केला जातो. नामांकित शाळांमध्ये विशेष दुकानातून खरेदीची अट घातल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अमुकअमुक दुकानातूनच गणवेश खरेदी करण्याचा अट्टाहास केल्याने पालकांना खिसा खाली करावा लागत आहे.
...............................................................................................

आपल्या विभागाकडून केवळ शासकीय शाळांनाच साहित्याचा पुरवठा केला जातो. यात गणवेश व पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. तसेच आवश्यकता भासल्यास शासनाच्या शेषफंडातून दफ्तरांचा देखील पुरवठा केला जातो.
सौ. तांडेल
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, वसई

https://www.facebook.com/Kunal-Jadhav-108981482841014/

No comments:

Post a Comment