Friday 24 June 2016

आज एक चांगला माणुसकीचा अनुभव आला...


मी कुणाल जाधव, 17 जून रोज चा दिवस तसाच आजचाही...फक्त निघण्याची वेळ तेवढी वेगळी...ऑफिस 6 वाझता सुटण्याचा तसा मला फारसा अनुभव नाही...सहा वाझता निघालो गाडी कोणती पकडायची हा मोठा प्रश्न त्यात गर्दी ची कधी सवय नाही... तरी ठरवले आधी अंधेरी ला जाऊ नंतर विचार केला डायरेक्ट विरारच पकडू... पण फायनली ठरले बोरिवली ला जाऊन तिथून निघणारी नालासोपारा पकडू... फायनली बोरिवली ला आलो आणि नंतर समझले माझ्या सारखा विचार करणारे खूप कलाकार आहेत.... गर्दी पहिली प्लॅटफॉर्म वर पाय ठेवायलाही जागा नाही.. याआधी दोन वेळा चष्मा तुटला होता...त्यामुळे सर्वात जास्त चशम्याचे टेंशन...म्हणून चढताना एक हात किश्यावर सर्वात पहिले चढणार तर घड्याळ तुटून खाली पडले ...मागे येऊन थोडा लेट चढलो... नंतर विचार केला खाली गेले असावे एवढ्या गर्दीत....आत आलो ...आधी राग आला नंतर विचार केला जाऊदे जुनेच होते... आत येऊन स्वतःचाच राग करत येऊन उभा राहिलो...
5 मिनट आसाच...तुम्ही म्हणत असाल एवढा राग कसला त्यात काय? पण, माझा स्वभावच थोडा तसा आहे...
मोबाईल काढून पाहतोच तर गेटवरच्या एका माणसाचा आवाज आला "किसका घडी गिरा है क्या??" मी इतका खुश कि माझी सोन्याची अंगठी पडलेली आणि ते भेटली असा...मी म्हणालो मेरा है तो म्हणाला कलर कोणसा है..मी म्हणालो ब्राऊन...एका त्याच्या मागच्या माणसाने विचारले आणि त्याने मला कंपनी कोणासा है मी टायमॅक्स तेवढ्यात त्याने घड्याळ दिले...
किस्सा काही असा खूप मोठा नाही...पण त्यांतून मी माणुसकी आणि प्रामाणिकपणा पहिला.. म्हणून सांगावासा वाटला....
कुणाल जाधव
8976629534

No comments:

Post a Comment